PM Modi : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) जवळ आल्या आहेत. सर्वच पक्षांनी यावेळी आपली कंबर कसली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) आपल्या कामात सतत सक्रिय दिसत आहेत. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना स्पष्ट संदेश दिला असून विकासाची ब्ल्यू प्रिंट काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा (Action Plan) मागवला. पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना पुढील 5 वर्षांचा रोडमॅप देण्यास सांगितले आहे. बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, कोणत्या मंत्र्याचा पुन्हा विजय होईल किंवा नाही, याचा विचार न करता तुमच्या कल्पना, कृती योजना आणि रोडमॅप द्या.



"मंत्र्यांनी विजयाचा विचार न करता सर्व माहिती द्या" - PM मोदी


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा मागवला. पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना पुढील 5 वर्षांचा रोडमॅप देण्यास सांगितले आहे. बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, कोणता मंत्री पुन्हा निवडून येईल किंवा नाही याचा विचार न करता तुमच्या कल्पना, कृती योजना आणि रोडमॅप द्या.


 


मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ऊस खरेदीच्या दरात आठ टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ऊस खरेदीचा दर प्रतिक्विंटल 315 वरून 340 रुपये करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे.


 


'शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध'


मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. 2014 पूर्वी खत मिळवण्यासाठीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत होते. त्यावेळी उसाचा भाव रास्त नव्हता. शेतकऱ्यांना दोन वर्षे वाट पाहावी लागली. मात्र मोदी सरकारने या दिशेने उत्कृष्ट काम केले आहे. ठाकूर म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2019-20 मध्ये 75,854 कोटी रुपये मिळाले आहेत. 2020-21 मध्ये 93,011 कोटी रुपये मिळाले आहेत. 2021-22 मध्ये शेतकऱ्यांना 1.28 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. त्याच वेळी, 2022-23 मध्ये 1.95 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे पैसे थेट त्याच्या खात्यात पाठवले गेले.


 


हेही वाचा>>>


FRP मध्ये वाढ, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय!