Mann Ki Baat: कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विचारलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या नव्या वर्षामध्ये लोकांची सरकारकडून काय अपेक्षा आहे याच्याबद्दल मतही मागवलं आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अशी विचारणा केली आहे.


पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "सरत्या वर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि येत्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत." या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमासाठी लोकांचे विचार मागवले आहेत. याबाबत लोकांनी आपला संदेश 'MyGov' आणि 'नमो अॅप' वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.





या वर्षीचा शेवटचा 'मन की बात' कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात. 27 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.


बराक ओबामाही सामील
'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा सामील झाले होते. ओबामांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने 27 जानेवारी 2015 रोजी या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली होती. बराक ओबामा हे 2015 साली भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे होते.


महत्वाच्या बातम्या: