PM Modi on Jawahar Lal Nehru: काही दिवसांपूर्वी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याला उत्तर देताना 'माझ्या आजोबांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. त्यांच्याबद्दल कोणी प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.' अशी प्रतिक्रिया दिली होती. ज्यावर पलटवार करत 'मी कोणाचेही वडिल, आजोबा किंवा आईबाबत बोललेलो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांबाबत बोललो होतो.' असं विधान मोदी यांनी केलं आहे. 


काही दिवसांपूर्वी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरु यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, 'ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, त्या काळात नेहरु म्हणाले की, कोरियातील लढाई आपल्या देशावर परिणाम त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या किंमती वाढतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. असं म्हणत देशाच्या पंतप्रधानांनी महागाईची जबाबदारी झटकली होती.' दरम्य़ान या टीकेवर प्रतित्यूर देताना राहुल गांधी यांनी, 'माझ्या आजोबांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. त्यांच्याबद्दल कोणी प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. तसंच सध्या चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.' असं म्हणाले होते. ज्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या विधानावर पलटवार केला आहे.


कोणाच्या आजोबांवर नाही, तर पंतप्रधानांबाबत बोललो होतो- पीएम मोदी


ANI ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ''मी कोणाचेही वडिल, आजोबा, नाना किंवा आईबाबत बोललो नव्हतो. मी देशाच्या पंतप्रधानांबाबत बोललो होतो. तसंच सरकार बदलत असतं त्यामुळे तत्कालीन पंतप्रधानाची विचारसरणी वेगळी होती आता वेगळी आहे. स्थितीही बदलत असते. तसंच मी कायम नेहरुंचे नाव घेत नाही अशी टीका होते. आता मी घेत आहे, तर देखील अडचण होत आहे.''  



हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha