PM Modi Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) यांची आज संध्याकाळी विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी यांची ही विशेष मुलाखत आज संध्याकाळी 8 वाजता प्रसारित होणार असल्याची माहिती, एनआयए वृत्तसंस्थेनं (ANI) दिली आहे.


पंतप्रधान मोदी यांची मुलाखत एनआयए वृत्तसंस्थेच्या स्मिता प्रकाश घेणार आहेत. या मुलाखतीचा कालावधी 70 मिनिटे असणार आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींची आजची विशेष मुलाखत असून यात मोदी पाच राज्यांच्या निवडणुकीसह विविध विषयांवर संवाद साधणार असल्याची माहिती एनआयए वृत्तसंस्थेनं दिली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड  आणि मनिपूर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यामधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. 






पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आणि मंगळवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेस नसती तर देशाला आणीबाणीचा कलंक लागला नसता, भ्रष्टाचार वाढला नसता , जातीयता वाढली नसती यासह अनेक गंभीर आरोप काँग्रेसवर पंतप्रधान मोदी यांनी केले होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. याबरोबरच महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरवला, अशी टीका मोदी यांनी केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या या टीकेनंतर दोनच दिवसांनी म्हणजे आज ही मुलाखत होत आहे. त्यामुळे आजच्या मुलाखतीत मोदी काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


दोन दिवस काँग्रेसवर हल्लाबोल केल्यानंतर आजच्या मुलाखतीत नरेंद्र मोदी एखादा खुलासा करणार का?, की कालसारखीच आजही काँग्रेसवर टीकेची झोड उठवणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या 


PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी मानले शरद पवारांचे आभार, म्हणाले...


देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका


PM Modi in Rajyasabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतही विरोधकांवर निशाणा, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे