PM Modi Interview : पाच राज्यातल्या निवडणुका भाजप जिंकणार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलाय. निवडणुकांआधी पंतप्रधान मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला  दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत दावा केला आहे. या वेळी मोदींनी अखिलेश यादवांवर सडकून टीका करत उत्तर प्रदेशातही आम्हालाच बहुमत मिळणार असल्याचं म्हटलंय.


पंतप्रधान मोदी म्हणाले, आगामी निवडणुकीत आम्हाला पाच राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल. निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. सर्व राज्यात मला  भाजपाची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकेल. ज्या राज्यांत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली कारण तेथील जनतेने आम्हाला ओळखलं आहे. आमच्या कामाला पाहिलं आहे त्यानंतर आम्हाला मतदान केले आहे. 


दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. प्रत्येक राज्यात घराणेशाहीचा पक्ष असून, घराणेशाही पक्ष फक्त घराण्याचा विचार करतात देशाचा नाही असं म्हणत, पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना टोला लगावलाय. घराणेशाही पक्ष लोकशाहीसाठी घातक असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. 


लखीमपुर खीरी (Lakhimpur Kheri) प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुप्रिम कोर्टाला जी कमिटी हवी होती, त्याला राज्य सरकारने सहमती दिली होती. ज्या न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली तपास होणार होता त्याला देखील राज्य सरकारने परवानगी दिली होती. राज्य सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


PM Modi Interview : गेल्या 50 वर्षात कॉंग्रेसने देशाच्या विभाजनाचे काम केले, पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल


नेहरूंना त्यांच्या प्रतिमेची चिंता... म्हणून गोवा 15 वर्षे पारतंत्र्यात; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल



PM Narendra Modi Interview : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत लाईव्ह : ABP Majha