पर्रिकरांच्या शपथविधीनंतर अवघ्या काही मिनिटात मोदींकडून शुभेच्छा!
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2017 06:06 PM (IST)
मुंबई: मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. शपथविधी आटोपल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं खास अभिनंदनही केलं. पंतप्रधान मोदी सोशल मीडियाचा फारच खुबीनं वापर करतात असं कायम म्हटलं जातं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची दखल मोदी या माध्यमातून घेत असतात. आज गोव्यात पर्रिकरांच्या शपथविधीला भाजपचे अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. पण तरीही मोदींनी ट्विटरवरुन तात्काळ आपल्या शुभेच्छा पर्रिकरांपर्यंत पोहचवल्या. 'मनोहर पर्रिकर आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन. गोव्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पर्रिकरांना माझ्या मनापासून शुभेच्छा!' अशा शब्दात मोदींनी पर्रिकरांना आपल्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आज गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतली. पर्रिकरांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. संबंधित बातम्या: मनोहर पर्रिकर गोव्याचे 13वे मुख्यमंत्री, कोंकणीतून शपथ पर्रिकरांच्या शपथविधीला स्थगिती नाही, बहुमतासाठी 2 दिवसांचा अवधी! गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं? संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर… अडीच वर्षात 40 वर्षांचं काम ! गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री! गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव