जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा नरेंद्र मोदींना यंदाही कायम ठेवली. आज सकाळी पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या गुरेजमध्ये पोहचले होते. गुरेज सेक्टर सीमारेषेजवळ १५ कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी साजरा केली. यावेळी पंतप्रधांनी लष्करी गणवेष परिधान केला होता. मोदींनी यावेळी जवानांना आपल्या हातानं मिठाई भरवत त्यांचं तोंड गोड केलं.
याप्रसंगी मोदी यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावतही उपस्थित होते. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी 2014 मध्ये सियाचिनमध्ये जवानांबरोबर दिवाळी साजरी केली होती. 2015 च्या दिवाळीत ते डोगराई वॉर मेमोरियल येथे गेले होते. तर गेल्यावर्षी हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथील चीन सीमेवर तैनात आयटीबीपीच्या जवानांबरोबर मोदींनी दिवाळी साजरी केली होती.
https://twitter.com/PMOIndia/status/920961658335432704
2014 : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची पहिली दिवाळी होती. यावेळी मोदी सियाचिनला पोहोचले आणि तेथे भारतीय जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. 20 हजार फूट उंचावरील रणभूमीवर, जिथे मायनस 50 डिग्री तापमान असतं, तिथे आपले जवान देशाच्या सीमेवर तैनात असतात. पंतप्रधानांनी तिथे जाऊन दिवाळी साजरी करुन जवानांमध्ये नवा उत्साह भरला होता.
2015 : पंतप्रधान मोदींनी 2015 साली पंजाबमधील अमृतसरमध्ये डोगराई वॉर मेमोरियलमध्ये दिवाळी साजरी केली. तेथील जवानांसोबत मोठ्या उत्साहात मोदींनी दिवाळी साजरी केली.
2016 : हिमाचल प्रदेशातील किन्नोरमध्ये 2016 ची दिवाळी पंतप्रधान मोदींनी साजरी केली होती. आयटीबीपी, सैन्य आणि डोगरा स्काऊटसोबत दिवाळीचं सेलिब्रेशन केले.