देहरादून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाचव्या वर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज केदारनाथला जाण्यापूर्वी मोदी उत्तराखंडमधील हर्षील येथील भारत-चीन सीमेवर दाखल झाले. तिथल्या आयटीबीपी (ITBP) जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवळी साजरी करतात.

नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 2014 साली सियाचिन येथे भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर 2015 साली त्यांनी पंजाब सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2016 साली मोदी हिमाचल प्रदेश येथील सीमा भागात गेले. तिथल्या तिबेट सीमेवर त्यांनी पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. मागील वर्षी त्यांनी जम्मू-काश्मिरमधील गुरेज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.


याबाबत मोदी म्हणाले की, मी दरवर्षी देशाच्या सीमा भागात जातो. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करतो. तिथल्या जवानांना हैरान करतो. मला त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला, वेळ घालवायला जास्त आवडते.

वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन