नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटचा शपथविधी पार पडल्यानंतर आज खातेवाटप जाहीर (Modi Cabinet Portfolio) करण्यात आलं आहे. अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. 

त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे.

बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी

बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हे खातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे? पाहा संपूर्ण यादी

अमित शाह- गृहमंत्रालयराजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालयएस जयशंकर - परराष्ट्रनितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन - अर्थमंत्रालयशिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालयजितन राम मांझी- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय पियुष गोयल -वाणिज्यअन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालयभूपेंदर यादव - पर्यावरणके राममोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालयजेपी नड्डा- आरोग्य मंत्रालयसर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग मंत्रालयसी आर पाटील- जलशक्तीकिरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्रीअर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्रीचिराग पासवान - क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री प्रल्हाद जोशी - ग्राहक कल्याण मंत्रालयज्योतिरादित्य शिंदे- सूचना आणि प्रसारण मंत्रीमनसुख मंडाविया- कामगार मंत्रीहरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्रीएचडी कुमारस्वामी - अवजड उद्योग मंत्रीमनोहर लाल खट्टर- उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयराजीव राजन सिंह - पंचायत राज मंत्रालयविरेंद्र कुमार - सामाजिक न्याय मंत्रालयज्युएल ओराम- आदिवासी विकास मंत्रीगिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्रालयगजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयकिशन रेड्डी - कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

राव इंद्रजित सिंह- नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयजितेंद्र सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय अर्जुन राम मेघवाल - कायदा आणि न्याय मंत्रालयप्रतापराव जाधव - आयुष मंत्रालयजयंत चौधरी - कौशल्य विकास

राज्यमंत्री 

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्रीशोभा करंदाजे -  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयशांतनु ठाकुर - पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्रीरवनीत बिट्टू- अल्पसंख्यांक राज्यमंत्रीजितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयकृष्णन चौधरी- सहकार मंत्रालयरामदास आठवले - सामाजिक न्याय मंत्रालयनित्यानंद राय- गृह मंत्रालयअनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयव्ही सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे मंत्रालयचंद्रशेखर प्रेमासनी- ग्रामीण विकास मंत्रालयएस पी बघेर - दुग्ध विकास मंत्रालयक्रितीवर्धन सिंह - पर्यावरण बी एल वर्मा - सामाजिक न्यायसुरेश गोपी - पेट्रोलियम, पर्यंटनएल मुरुगन- माहिती आणि प्रसारणअजय तम्ता - रस्ते वाहतूक बंदी संजय कुमार - गृहमंत्रीकमलेश पासवान - कोळसा मंत्रालयसतीश चंद्र दुबे - खणन मंत्रालयसंजय सेठ - संरक्षण राज्यमंत्रीरणवीर सिंह - अन्न प्रक्रियादुर्गादास उइके- आदिवासी विकास मंत्रालयरक्षा खडसे - युवक कल्याण मंत्रालयसुकांता मुजुमदार - शिक्षणसावित्री ठाकुर - महिला आणि बालकल्याणतोखन साहू - शहर विकास मंत्रालयभूषण चौधरी - जलशक्तीभूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग मंत्रालयहर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट अफेअर्सनिमुबेन जयंतीभाई बाम्भनिया - ग्राहक निवारण आणि अन्न वितरण मुरलीधर मोहोळ - सहकार , नागरी उड्डाण मंत्रालयजॉर्ज कुरियन - अल्पसंख्याकपवित्रा मार्गारेट - परराष्ट्र