मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, मोदींनी ठणकावलं
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 05:25 PM (IST)
कोळीकोड : मुस्लिमांचा तिरस्कार करु नका, तर त्यांचा स्वीकार करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुस्लीम समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहू नका, असं वक्तव्यही मोदींनी कोळीकोडमध्ये केलं आहे. मुस्लिमांच्या मतांना केवळ बाजारातील वस्तू समजणाऱ्या विरोधकांना मोदींनी धारेवर धरलं. समाजामध्ये एकात्मतेची भावना कायम असली पाहिजे. राज्यकर्ते आणि पक्षाबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं मोदींनी सांगितलं. केरळमधल्या कोळीकोडमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.