नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सीएसआयआर सोसायटीची बैठक झाली. सोसायटीला संबोधित करताना पंतप्रधान नें मोदी म्हणाले की कोरोना जागतिक महामारी शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणून जगासमोर आली आहे. परंतु, इतिहास याचा साक्षीदार आहे, जेव्हा मानवतेवर मोठे संकट आलं आहे, तेव्हा विज्ञानाने चांगल्या भविष्याचा मार्ग तयार केला आहे.

Continues below advertisement

पीएम मोदी म्हणाले, मागील शतकाचा अनुभव असा आहे की यापूर्वी जेव्हा जगातील इतर देशांमध्ये कोणताही शोध लागत होता, तेव्हा भारताला त्यासाठी बरीच वर्षे थांबावे लागत होते. परंतु, आज आपल्या देशातील वैज्ञानिक त्याच वेगाने काम करत इतर देशांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आमच्या वैज्ञानिकांनी 1 वर्षाच्या आतच मेड इन इंडिया कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे.

पीएम मोदी पुढे म्हणाले, "आज भारत शाश्वत विकास आणि स्वच्छ उर्जा क्षेत्रात जगाला मार्ग दाखवित आहे. सॉफ्टवेअरपासून उपग्रहापर्यंत आपण अन्य देशांच्या विकासालाही वेग देत आहोत, जगाच्या विकासात भारत मुख्य इंजिनची भूमिका निभावत आहे. "आज भारताला शेतीपासून खगोलशास्त्र, लसीपासून वर्चुअल रियलिटी पर्यंत, बायोटेक्नॉलॉजीपासून बॅटरी तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक दिशेने स्वावलंबी आणि सक्षम बनण्याची इच्छा आहे. कोरोनामुळा हा वेग मंदावला आहे, मात्र स्वावलंबी भारत, सशक्त भारत." ही आपला संकल्प आहे.

Continues below advertisement