India Corona Cases : कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. जगात सर्वाधिक दैंनदिन रुग्णसंख्या भारतात नोंदवली जाते. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 32 हजार 364 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2713 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 7 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी 1 लाख 34 हजार 154 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच 2887 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. 


आज देशात सलग 22व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून अधिक कोरोनामुक्तांची संख्या आहे. 3 जूनपर्यंत देशभरात 22 कोटी 41 लाख 9 हजार 448 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच काल दिवसभरात 28 लाख 75 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 35 कोटी 74 हून अधिक कोरोना चाचण्यात करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20.75 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 85 लाख 74 हजार 350
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 65 लाख 97 हजार 655
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 16 लाख 35 हजार 993
मृतांचा एकूण आकडा : 3 लाख 40 हजार 702


देशाचा कोरोना मृत्यूदर 1.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्क्यांहून अधिक जाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 6 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण बाधितांच्या संख्येतही भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


राज्यात गुरुवारी 25,617 डिस्चार्ज तर 15,229 नवीन कोरोनाबाधित


राज्यात काल (गुरुवारी) तर 15,229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 25,617 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 307 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दहा हजाराने जास्त आहे. राज्यात काल एकूण 204974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 54,86,206 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.73% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1566490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला. आता मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आता आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 961 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 897 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,75,193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,612 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 500 दिवसांवर पोहोचला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर; आजपासून लसीकरण पूर्ववत