वाराणसीत 5 किलोमीटरचा रोड शो केल्यानंतर मोदींनी काशी विद्यापाठीत सभाही घेतली. 13 वर्षांनंतर देशाच्या पंतप्रधानांची काशी विद्यापीठात सभा झाली. यावेळी मोदींनी समाजवादी पार्टीसह काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला.
भविष्यात काँग्रेस नावाचा एखादा पक्ष होता, हे शोधण्यासाठी पुरातत्व विभाग स्थापन करावा लागेल, असा टोला मोदींनी लगावला. भाजपचा मंत्र ‘सबका साथ, सबका विकास’ असून सपा, बसपा आणि काँग्रेसचा मंत्र ‘कुछ का साथ , कुछ का विकास’ असल्याची टीकाही मोदींनी केली.
8 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर 11 मार्चला निकाल लागणार आहे.