नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. एक्झाम वॉरियर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये परीक्षेच्या काळात तणावाला कसं दूर ठेवता येईल याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत पुस्तक उपलब्ध होणार आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्गदर्शन करणारं ठरणार आहे. पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.
पेंग्विनद्वारे या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं आहे. यात लहान मुलांच्या चित्रासोबत नरेंद्र मोदींचंही चित्र दाखवण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदींचे विद्यार्थ्यांना धडे, 'एक्झाम वॉरियर्स' पुस्तक प्रकाशित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2018 06:18 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. एक्झाम वॉरियर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये परीक्षेच्या काळात तणावाला कसं दूर ठेवता येईल याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -