जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियत्रंण रेषेजवळ (एलओसी) हिमस्खलनामुळे एक चौकी उद्धवस्त झाली. यावेळी बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन जवान शहीद झाले.


संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माचिल सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या पथकातील चार जवान हिमस्खलनामुळे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले.

यावेळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आल्याने चारही जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्या चौघांनाही जवळच्या चौकीत नेण्यात आलं. पण यापैकी गंभीर जखमी झालेल्या तीन जवानांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. हवलदार कमलेश सिंह (39), नायक बलवीर (33), आणि शिपाई राजिंदर (25) हे तिघेही शहीद झाले. तर चौथ्या जवानावर सध्या उपचार सुरु आहेत. तीनही शहीद जवान हे राजस्थानमधील आहेत.