नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे गेल्या दिवसापासून मोदी सरकरावर बरीच टीका होत आहे. याचबाबत आता पंतप्रधान मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'अर्थव्यवस्थेसाठी जी काही पावलं उचलण्यात आली त्याची राजकीय किंमत मला चुकवावी लागणार आहे. पण आम्ही अजिबात मागे हटणार नाही.' असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.
'बदल केले त्याची किंमत चुकवावी लागेल' दिल्लीतील एका वृत्तापत्राच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'देशाला एका उंचीवर नेण्यासाठी मी जो मार्ग निवडला आहे आणि त्यासाठी जी पावलं मी उचलली आहे त्यामुळे मला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल. याची मला पूर्णपणे जाणीव आहे.' यावेळी मोदींचा रोख पूर्णपणे नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर होणाऱ्या टीकेवर होता.
'डिजिटल व्यवहारामुळे भ्रष्टाचार थांबेल' यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 'आम्ही एका अशा व्यवस्थेकडे जात आहोत की, ज्यामुळे काळापैसा आणि भ्रष्टाचार कमी करण्यास मदत होणार आहे. जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहारास सुरुवात करु त्यावेळी संघटित भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात थांबेल.'
'मोठ्या परिवर्तनासाठी संपूर्ण व्यवस्थेत बदल करावे लागतात' 'मोठे आणि स्थायी परिवर्तन हे असंच होत नाही. यासाठी संपूर्ण व्यवस्थेत बदल करावे लागतात. जेव्हा हे बदल होतात तेव्हा देश फक्त तीन वर्षात ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये 142 वरुन 100 वर पोहचतो.' असंही मोदी यावेळी म्हणाले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षाकडून नोटाबंदी आणि जीएसटी यावर बरीच टीका केली जात आहे. त्यामुळे याच टीकेला पंतप्रधान मोदींनी आज उत्तर दिलं आहे.
संबंधित बातम्या : GSTनंतर नफेखोरीला चाप लावण्यासाठी सरकारकडून खास उपाययोजना नोटाबंदी म्हणजे संघटीत लूट,अर्थव्यवस्था उद्ध्वस्त: मनमोहन सिंह
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे विकास मंदावला : आयएमएफ
मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा
'विकास दर घसरण्याला नोटाबंदी कारणीभूत नाही''
नोटाबंदी : नफा, तोटा, सरकार-विरोधकांचे दावे, 10 महत्वाचे मुद्दे
नोटाबंदी : 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा!
नोटाबंदी इफेक्ट! देशात अब्जाधीशांची संख्या घटली!
नोटाबंदी दरम्यान एकही बनावट नोट सापडली नाही, अर्थमंत्रालयाचा दावा
नोटाबंदी काळात काळ्याचं पांढरं करणारे 34 CA सरकारच्या रडारवर
नोटाबंदी : घर आणि वाहन विक्रीत घट
'नोटाबंदी म्हणजे आर्थिक अराजक', शिवसेनेची थेट मोदींवर टीका
नोटाबंदी ही क्रांती नाही तर बेबंदशाही आहे: नारायण राणे
नोटाबंदी हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिलं पाऊल : मोदी