PM Modi : आज (12 जानेवारी) महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी येथे कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता पुद्दुचेरीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. भारतातील तरुणांच्या मनाला आकार देणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीसाठी एकसंघ शक्तीमध्ये रूपांतरित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. 


राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी 'माझ्या स्वप्नांचा भारत' आणि 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अज्ञात नायक' या विषयावरील निवडक निबंधांचे अनावरण करतील. दोन विषयांवर एक लाखाहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून या निबंधांची निवड करण्यात आली आहे. तसेच समिट दरम्यान, तरुणांना पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) नेतृत्वाखालील विकास, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नाविन्य, स्वदेशी आणि प्राचीन ज्ञान, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्र उभारणी या विषयांवर त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी मिळेल.


तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन
दुपारी 4 वाजता, पंतप्रधान मोदी तमिळनाडूमधील 11 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे आणि चेन्नईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळच्या नवीन कॅम्पसचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करतील. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यापैकी सुमारे 2145 कोटी रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित तामिळनाडू सरकारने दिले आहेत. विरुधुनगर, नमक्कल, निलगिरी, तिरुपूर, तिरुवल्लूर, नागापट्टिनम, दिंडीगुल, कल्लाकुरीची, अरियालूर, रामनाथपुरम आणि कृष्णगिरी या जिल्ह्यांमध्ये नवीन महाविद्यालये उभारली जात आहेत. आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या सर्व भागात पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने ही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. 





 



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha