नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर सुरू झालेली युद्धे आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे मागील अनेक दशकांतील विकास धोक्यात येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या पुन्हा गरिबीत ढकलली जाऊ शकते असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नेदरलँड्समधील द हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी जगासमोरील ऊर्जा संकटाबाबत चिंता व्यक्त केली.

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्धे सुरू झाली आणि आता ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर गेल्या दशकांतील सर्व उपलब्धी नष्ट होऊ शकतात.”

Global Energy Crisis: जागतिक ऊर्जा संकटावर मोदींचा गंभीर इशारा

पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर ताण निर्माण झाला असून विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

Continues below advertisement

India Innovation Power: 'आज भारत इनोव्हेशन पॉवर'

भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल फोन उत्पादक देश बनला आहे. एकेकाळी मोबाईल आयात करणारा भारत आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवोन्मेष क्षमता जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Startup Growth : भारतात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स

पंतप्रधानांनी सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी देशात 500 पेक्षाही कमी स्टार्टअप्स होते. आज ही संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे. 2014 मध्ये भारतात केवळ चार युनिकॉर्न कंपन्या होत्या, तर आता त्यांची संख्या सुमारे 125 पर्यंत पोहोचली आहे.

Semiconductor Mission : चिप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताची मोठी झेप

भारत सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी प्रगती करत असून देशात 12 सेमीकंडक्टर प्रकल्पांवर काम सुरू आहे. यापैकी दोन प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. “डिझाइन इन इंडिया, मेड इन इंडिया” या संकल्पनेतून भारत जागतिक चिप उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं मोदी म्हणाले.

Youth Aspirations : भारताचा युवा आकाशाला गवसणी घालण्यास तयार

आज भारताचा युवा मोठी स्वप्नं पाहत आहे. त्याला केवळ बदल नको आहे, तर सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान प्रगती हवी आहे, असं सांगत मोदी यांनी तरुणांच्या आकांक्षा आणि देशाच्या अमर्याद क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

ही बातमी वाचा: