PM Narendra Modi Undertook 21 Trips Abroad : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi News) यांच्या परदेश दौऱ्याबाबत नेहमीच चर्चा होत आहे. किती वेळा परदेश दौऱ्यावर गेले? किती रुपयांचा खर्च झाला? याबाबत विरोधक नेहमीच निशाणा साधत असतात. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले, त्यानंतर ते कितीवेळा परदेश दौऱ्यावर गेले? याबाबत नेहमीच प्रश्न विचारला जातो.  अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 नंतर आतापर्यंत 21 वेळा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती दिली. 2019 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 वेळा विदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या परदेश दौऱ्यावर 22.76 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन यांनी एका प्रश्नाच्या लिखीत उत्ताराला राज्यसभेत मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती दिली. परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, 2019 पासून आतापर्यंत राष्ट्रपतींचे आठ परदेश दौरे झाले आहेत. यावर आतापर्यंत  6.24 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यासाठी 22,76,76,934 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 20,87,01,475 रक्कम खर्च झाली आहे. 


आणखी कोणत्या नेत्यांनी किती दौरे केले ? 


परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, 2019 पासून राष्ट्रपतींनी आठ परदेश दौरे केले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परदेश दौरे केले आहेत. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 86 परदेश दौरे केले आहेत. 2019 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा जापान, दोन वेळा अमेरिका आणि एक वेळा संयुक्त अरब अमीरात  या देशात दौरा केला आहे.  राष्ट्रपतींच्या आठ परदेश दौऱ्यात सात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यांचा समावेश आहे.  तर विद्यमान राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांचा एक दौरा आहे.  द्रौपदी मुर्मू सप्टेंबर 2022 मध्ये ब्रिटन दौऱ्यावर गेल्या होत्या.   






आणखी वाचा :
2024 च्या अखेरीस आम्ही अमेरिकेप्रमाणे रस्ते अन् उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करु: नितीन गडकरी