Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला फक्त एक वर्षाचा कालावधी राहिलाय. त्यापूर्वीच प्रत्येक पक्षानं तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्षांनी आपली 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार केली आहे. 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप प्रयत्नशील असेल... पण भाजपला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारी आणि महागाईवरुन विरोधाक सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा काढली आहे, त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. अशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी विजय सोपा नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे. 


ज्याप्रमाणे गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला होता, त्याचप्रमाणे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करु शकतात, अशी शक्यता आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजावर इंडिया टुडे आणि सी व्होटर यांनी एकत्र सर्वे केला आहे. या सर्वेनुसार, सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएला 284 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीएला 191 जागा मिळू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अद्याप कायम असल्याचेही सर्वेच्या आकड्यातून स्पष्ट होतेय. तब्बल 72 टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर संतुष्ट आहेत. तसेच मोदी सरकार विरोधकांना मात देण्यात यशस्वी ठरल्याचेही मत लोकांनी नोंदवलं आहे. 


मोदी सरकारपुढे नेमक्या अडचणी काय ? 


भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं अपयश कोणतं ? असा प्रश्न सर्वेत विचारण्यात आला होता. 25 टक्के लोकांनी महागाई आणि वाढती किंमत हे मोदी सरकारचं अपयश असल्याचं सांगितलं. तर 17 टक्के लोकांनी बेरोजगारी हे मोदी सरकारचं अपयश असल्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय आठ टक्के लोकांनी मोदी सरकार कोरोना महामारीसोबत दोन हात करण्यास अपयश आल्याचं कारण सांगितलं. 


मोदी सरकारच्या जमेच्या बाजू कोणत्या ?


मोदी सरकारच्या जमेच्या बाजू कोणत्या ? असाही प्रश्न सर्वेत विचारण्यात आला होता. यामध्ये 20 लोकांच्या मते मोदी सरकारनं कोरोना महामारीविरोधात यशस्वी लढा दिला आहे. त्याशिवाय, कलम 370 रद्द करणे, हा मोदी सरकारचा चांगला निर्णय होता, असे 14 टक्के लोकांना वाटतेय. तर राम मंदिर निर्माण हा 12 टक्के लोकांना चांगला निर्णय वाटतोय. 


नोट - 
या सर्वेशी एबीपी माझा सहमत असेल असं नाही. इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी घेतलेल्या सर्वेबाबतची माहिती फक्त देण्यात आली आहे. 


आणखी वाचा :
2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा मुख्य 'राजकीय दुश्मन' राहुल गांधी नाहीत, मग कोण? सर्वे काय सांगतोय