नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय महिला आपल्या साडीवर उलटा पदर कधीपासून घेऊ लागल्या, त्याची सुरुवात कोणी केली याबद्दल मनोरंजक माहिती दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की गुरुदेव रविंद्रनाथ टागोर याचे मोठे बंधू आणि भारतातील पहिले आयसीएस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांच्या पत्नी ज्ञानंदिनी देवी यांनी भारतीय महिलांना डाव्या खांद्यावर पदर घ्यायला शिकवलं. पंतप्रधान नरेंद् मोदींनी असही सांगितलं की सत्येद्रनाथ टागोर यांची आयसीएस अधिकारी म्हणून गुजरातमधील अहमदाबाद मध्ये नियुक्ती झाली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले की, "सत्येंद्रनाथ यांच्या पत्नी ज्ञानंदिनी या अहमदाबादमध्ये रहायच्या. स्थानिक महिला उजव्या खांद्यावर आपला पदर घ्यायच्या. पण त्यामुळं महिलांना काम करताना अडचण यायची. ज्ञांनदिनी देवी यांनी यावर कल्पना सूचवली की साडीचा पदर उलटा म्हणजे डाव्या खांद्यावर घ्यावा. आता मला याबाबत नेमकं माहित नाही पण डाव्या खांद्यावर पदर घ्यायला ज्ञानंदिनी देवींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. महिला सबलिकरणाशी निगडीत या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे."


पंतप्रधानांनी त्यांच्या संबोधनात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि गुजरात संबंधावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटलं की, "गुरुदेवांच्या बाबतीत बोलताना गुरुदेव आणि गुजरातच्या ऋणानुबंधाचं स्मरण करण्याचा मोह आवरत नाही. ही गोष्ट नेहमी स्मरणात ठेवण्याची गरज आहे कारण आपण एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेशी बांधील आहोत. विविधतेनं नटलेला आपला देश एक आहे."


पहा व्हिडिओ: PM Modi Speech | भारताचा आत्मा, स्वावलंबन, स्वाभिमान एकमेकांशी जोडलेले : नरेंद्र मोदी



महत्वाच्या बातम्या: