नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांत देशात बदल झाले आहेत का? नागरिकांचे अच्छे दिन आले का? देशाच्या विकासाचा वेग वाढला की अपेक्षांचं ओझं वाढलं? मोदी सरकारच्या काळात देशाचा चेहरा किती बदलला? किती लोकांचं आयुष्य बदललं? अखेर काय आहे देशाचा मूड?


 

 

मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त एबीपी आणि IMRB INTERNATIONAL या सर्व्हे एजन्सने देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात अच्छे दिन आले का?, पंतप्रधान म्हणून मोदींचं काम कसं आहे? देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण? आणि महत्त्वाचा प्रश्न आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाला मत देणार?, असे प्रश्न मतदारांना विचारले.

 

 

जर आताच निवडणुका झाल्या तर फार बदल होणार नाही. मोदी लाट अद्यापही कायम आहे. पंजाब वगळता दुसऱ्या ठिकाणी भाजपला कोणतंही नुकसान होणार नसल्याचं दिसतं. आसाम आणि उडिसामध्ये यश मिळेल. यूपीमध्ये सध्याची स्थितीच कायम राहण्याची शक्यता आहे. तर बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने गमावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा अंदाज आहे. दक्षिणमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये भाजपची मतं आणि जागा वाढताना दिसत आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्ये मताचे टक्के वाढण्याची चिन्ह आहेत, मात्र जागा कमी होतील.

 

 

दुसरीकडे यूपीएच्या जागांमध्ये फारसा फरक दिसत नाही. पण त्यांच्या व्होटशेअरमध्ये वाढ होईल.

 

 

काय आहे देशाचा मूड ?

 

1. सर्वात लोकप्रिय नेता कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी - 47 %

राहुल गांधी  -  06%

सोनिया गांधी  -  09%

नितीश कुमार  -  04%

अरविंद केजरीवाल  - 06%

 

 

2. दोन वर्षात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं काम कसं आहे?

खूप चांगलं - 9%

चांगलं  - 40%

साधारण - 32%

वाईट  - 15%

अतिशय वाईट - 3%

 

3. मोदी सरकारच्या दोन वर्षात अच्छे दिन आले?

होय - 38%

नाही - 44%

माहित नाही -  18%

 

 

4. नितीश 2019 मध्ये पंतप्रधान बनू शकतात?

होय -16%

नाही - 49%

माहित नाही - 35%

 

 

5. प्रत्येक भारतीयाला 'भारत माता की जय'चा जयघोष करायला हवा?

होय - 79%

नाही - 11%

माहित नाही - 10%

 

 

6. मोदी सरकारच्या कार्यकाळात असहिष्णुता वाढल्याचा आरोप योग्य आहे?

होय - 29%

नाही - 39%

माहित नाही - 32%

 

 

7. जेएनयू आणि इतर विद्यापीठातील वाद मिटवण्यात मोदी सरकारला यश आलं?

होय - 44%

नाही - 42%

माहित नाही - 14%

 

 

8. काँग्रेसच्या नेत्यांनी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात लाच घेतली?

होय -  67%

नाही - 17%

माहित नाही  - 16%

 

 

9. काळा पैसा परत आणण्याबाबत मोदी सरकारची कामगिरी कशी आहे?

अपेक्षेपेक्षा चांगली - 7%

अपेक्षेप्रमाणे -  18%

अपेक्षेपेक्षा कमी  -  42%

माहित नाही - 32%

 

 

10. महागाई रोखण्यासाठी सरकारचं काम कसं आहे?

अपेक्षेपेक्षा चांगलं -  14%

अपेक्षेप्रमाणे - 21%

अपेक्षेपेक्षा कमी   – 35%

माहित नाही – 30%

 

 

11. स्वातंत्र्यानंतर सर्वात चांगले पंतप्रधान कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी - 24%

अटल बिहारी वाजपेयी - 20%

इंदिरा गांधी  -  20%

जवाहरलाल नेहरु -   6%

 

 

12. आता निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

 

एनडीएला किती जागा?

उत्तर भारत - 126 जागा

दक्षिण भारत  - 50 जागा

पूर्व  भारत - 62 जागा

पश्चिम  भारत - 104 जागा

एकूण - 342 जागा (+3)

 

यूपीएला किती जागा?

उत्तर भारत - 09 जागा

दक्षिण भारत - 21 जागा

पूर्व भारत - 24 जागा

पश्चिम भारत - 12 जागा

एकूण - 66 जागा (+4)

 

लेफ्टला किती जागा?

उत्तर भारत  - 0 जागा

दक्षिण भारत  - 8 जागा

पूर्व  भारत - 6 जागा

पश्चिम भारत - 0 जागा

एकूण - 14 जागा (+4)

 

इतर

उत्तर भारत - 96 जागा

दक्षिण  भारत - 55 जागा

पूर्व भारत - 50 जागा

पश्चिम भारत - 0 जागा

एकूण - 121 जागा (-11)

 

कसा झाला सर्व्हे?

हा सर्वे 7 मे ते 16 मे दरम्यान झाला. एकूण 14 हजार 658 मतदारांना त्यांचं मत विचारलं. 18 राज्यांमध्ये 101 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी बातचीत करण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे करण्यात आला आहे.