मिठ्या मारण्याचा विश्वविक्रम, ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2016 02:37 PM (IST)
नवी दिल्ली : एका भारतीयाने असा विक्रम केला आहे, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. हैदराबादमधील या व्यक्तीने एका मिनिटात सर्वाधिक मिठ्या मारण्याचा विक्रम केला आहे. विश्वविक्रमासाठी हल्ली काहीही केले जाते, असे वाटू शकते. हैदराबादमधील एका व्यक्तीने असेच काहीतरी हटके केले आहे. हैदरबादमधील किशन कुमार या व्यक्तीने एका मिनिटात तब्बल 79 जणांना मिठ्या मारुन, विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. किशन कुमार यांनी एका मिनिटात 79 जणांना मिठ्या मारुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. पाहा व्हिडीओ :