नागपूर : जगभरातल लाखो लोक त्यांचा कान स्वच्छ करण्यासाठी किंवा खाजवण्यात कॉटन इअर बड वापरतात. पण इअर बड कानात खूपच आत घातला तर काय काय होतं?


 

नागपूरमधील एका व्यक्तीला याचं उत्तर सापडलं. या व्यक्तीने कान स्वच्छ करण्यात इअर बड वापरला. पण हे करत असताना त्याने इअर बड खूपत आतपर्यंत नेला. त्यातच बडचा कापूस पडला आणि कानात अडकला.



कापूस कानात अडकल्याने तो डॉक्टर कृणाल कराडेंकडे गेला. कापूस अजूनही कानात असल्याचं त्याला समजलं.

 

डॉक्टर कृणाल कराडेंनी ओटो एन्डोस्कोपिकद्वारे काळजीपूर्वक रुग्णाच्या कानातून कापूस काढला. ही संपूर्ण प्रक्रिया त्यांनी चित्रीत केली. त्याचा हा ग्राफिक व्हिडीओ...