नवी दिल्ली : आज बुद्ध पौर्णिमा आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे एका प्रार्थना सभेमध्ये सहभागी होणार आहेत. ही प्रार्थना सभा कोरोना व्हायरस बाधित आणि महामारीशी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानासाठी आयोजित केली आहे. संस्कृती मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. जगातील बौद्ध संघ आणि त्यांच्या प्रमुखांच्या मदतीने आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या सहयोगाने हा कार्यक्रम होत आहे. या प्रार्थना सभेनंतर पीएम मोदी जनतेशी संवाद देखील साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वेसाक दिनानिमित्तानं जनतेशी ते सकाळी 9 वाजता संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरात यंदा बुद्ध पौर्णिमा आपापल्या घरातच साजरी केली जाणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या स्मरणार्थ आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांसाठी आजचा हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघ सहभागी होणार आहेत.
आज, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान वर्डोमीटरच्या माहितीनुसार, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 52 हजार 987 वर पोहोचली आहे. देशभरात 15 हजार 331 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1785 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 27.41 टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
PM Narendra Modi | बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान, पंतप्रधान मोदी साधणार संवाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2020 07:59 AM (IST)
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या स्मरणार्थ आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांसाठी आजचा हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील बौद्ध संघ सहभागी होणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -