PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 9.15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या वेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील, देशात घडत असलेल्या घटनांवर यावेळी मोदी काय बोलणार? याकडे देशवासियांचं लक्ष लागलंय.
नववे शीख गुरू, गुरु तेग बहादूर यांची शिकवणीवर आधारित कार्यक्रम
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा कार्यक्रम भारत सरकार दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आयोजित करत आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात (20 आणि 21 एप्रिल) देशाच्या विविध भागातील नागरिक सहभागी होणार आहेत. यावेळी स्मरणार्थी नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात येणार आहे. गुरु तेग बहादूर यांच्या जीवनाचे चित्रण करणारा भव्य लाईट अँड साऊंड शो देखील होणार आहे. याशिवाय शिखांच्या पारंपरिक मार्शल आर्टचेही आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नववे शीख गुरू, गुरु तेग बहादूर यांची शिकवणीवर आधारित आहे.
धर्म, मानवी मूल्ये, आदर्श आणि तत्वांच्या रक्षणासाठी..
जगाच्या इतिहासात धर्म, मानवी मूल्ये, आदर्श आणि तत्वांच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादूर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्याचे सरकारच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यांची पुण्यतिथी, 24 नोव्हेंबर हा दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. दिल्लीतील गुरुद्वारा सिस गंज साहिब आणि गुरुद्वारा रकाब गंज त्यांच्या पवित्र बलिदानाशी संबंधित असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यांचा वारसा या राष्ट्रासाठी एकजुटीची मोठी शक्ती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शीख गुरु तेग बहादूर यांना श्रद्धांजली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी शीख गुरू तेग बहादूर यांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हटले की, त्यांच्या आणि गुरु गोविंद सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे भारताच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली. गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लाल किल्ल्यावर झालेल्या समारंभात ते म्हणाले की, शीख गुरूंनी काश्मिरी पंडित आणि इतर हिंदूंच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
MPSC Recruitment 2022 : MPSC कडून 250 पदांसाठी भरती सुरू, पात्रतेपासून अर्जाची शेवटची तारीख, सर्वकाही जाणून घ्या
Crime News : दिल्लीत भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भररस्त्यात 6 गोळ्या झाडल्या, सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू