Mulayam Singh Yadav News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (UP Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती रविवारी अचानक बिघडली. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर  ICU मध्ये उपचार सुरु आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे पुत्र अखिलेश यादव (Akhilesh Yadav)यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मुलायमसिंह यादव  हे सध्या 82 वर्षांचे असून  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी अखिलेश यादव यांच्याकडून फोनवरून चर्चा करत मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतलं. 


राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे की, "उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृती अस्वस्थ्याची माहिती मिळताच मी त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोललो. मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतली.  माझी प्रार्थना आहे की, ते लवकर बरे होवोत.''






राहुल गांधी यांनीही केलं ट्विट 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "मुलायम सिंह यांच्या प्रकृतीसंदर्भात बातमी मिळाली. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी माझी मी प्रार्थना करतो."





 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही मुलायम सिंह यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. सपा नेते राकेश यादव म्हणाले की, "मुलायम सिंह यादव यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांची ऑक्सिजनची पातळी थोडीशी खाली आली आहे. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांची नियमित तपासणी दररोज केली जात आहे."


इतर महत्वाच्या बातम्या


Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूमध्ये दाखल


मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी कालवश, गुरुग्रामच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास