PM Narendra Modi : शेतकऱ्यांना (Farmers) स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांचे अनुदानाची तरतूद केली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. युरियाच्या एका पिशवीची किंमत तीन हजार रुपये असताना, शेतकऱ्यांना तो 300 रुपयांना उपलब्ध करून दिला जात असल्याचे मोदी म्हणाले. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.
जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपेक्षा जास्त दराने युरिया विकला जात आहे. ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेत 3 हजार रुपयांना विकली जाते, तोच युरिया आता सरकार आपल्या शेतकर्यांना 300 रुपये दराने विकते. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. मी तुमच्यातून आलोय,तुमच्यसाठी जगतोय. मी स्वप्न देखील तुमच्यासाठी पाहतोय. मी कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही मला ही जबाबदारी दिली म्हणून मी हे करत नाही तर हा देश माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना दु:ख झालेले मी पाहू शकत नाही असेही मोदी म्हणाले. आमच्यासाठी नेशन फर्स्ट असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदींनी सलग 10 वर्षे झेंडा फडकावून देशाला संबोधित केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी हे देशातील चौथे पंतप्रधान आहेत, की त्यांनी सलग दहा वर्षे झेंडा फडकावून देशाला संबोधित केले आहे. यापूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांच्या नावावर हा रेकॉर्ड होता. जवाहरलाल नेहरु यांनी 17 वेळा देशाला संबोधित केले आहे. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी 72 मिनिटे इतका होता. इंदिरा गांधी यांनी 16 वेळा तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा झेंडा फडकावून देशाला संबोधित केले आहे. मनमोहन सिंह यांनी दहावेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी 50 मिनिटे इतका होता.
महत्वाच्या बातम्या: