नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा "वन नेशन, वन इलेक्शन' चा सूर आळवला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन' ही संकल्पना सध्याच्या काळात देशासाठी आवश्यक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदीं म्हणाले की, देशात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांमुळे विकास कामांवर परिणाम होतोय. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संविधान दिनानिमित्त अखिल भारतीय पीठासन अधिकारी सम्मेलनाच्या शेवटच्या सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधन केले.


याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26/11 मुंबई हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली. त्यावेली मोदी म्हणाले की भारत आता नव्या पध्दतीने आणि नव्या नीतीने दहशतवाद्यांशी लढत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "भारतात काही महिन्यांच्या अंतरावर सातत्याने निवडणुका होतात. त्याचा परिणाम विकास कार्यावरती होतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे आता 'वन नेशन, वन इलेक्शन' या संकल्पनेवर गंभीरपणे चर्चा करणे आवश्यक झाले आहे."


त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सिंगल व्होटर्स लिस्टची सूचना देताना सांगितलं की, "वेगवेगळ्या लिस्टमुळे देशातील संसाधने वाया जातात. आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की देश आणि त्याच्या नागरिकांपेक्षा ज्यावेळी राजकारण मोठं होतं त्यावेळी संपूर्ण राष्ट्राला त्याचा परिणाम भोगावा लागतो."


'वन नेशन, वन इलेक्शन' ही संकल्पना याआधी अनेकवेळा चर्चेत आली आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्यावरुन संबोधन करताना लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकीबद्दल आपली कल्पना लोकांसमोर मांडली होती. त्यांवेळी मोदी म्हणाले होते की, "जीएसटीने वन नेशन, वन टॅक्स च्या स्वप्नाला सत्यात आणले आहे. आपल्या प्रयत्नांने उर्जा क्षेत्रात आपण वन नेशन, वन ग्रिड ही कल्पना सत्यात आणली. आपण वन नेशन, वन मोबिलिटी कार्ड सिस्टमदेखील विकसित केली आहे. आता एक राष्ट्र, एक निवडणूक या संकल्पनेवर चर्चा करणे आणि या संकल्पनेला लोकशाहीच्या माध्यमातून अंमलात आणने आवश्यक आहे."


महत्वाच्या बातम्या: