चंदीगड : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा निदर्शकांनी तब्बल 15 ते 20 मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर आता केंद्र आणि पंजाब राज्य सरकारमधील संबंध ताणण्याची शक्यता आहे. तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंतपणे दिल्लीला जाऊ शकलो असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने या मुद्द्यावरुन पंजाब सरकारला चांगलंच झापलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबमधली सभा सुरक्षेतल्या उणीवांमुळे रद्द करण्याची वेळ आली. आज फिरोजपूरमध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पोहचणार होते. पण निदर्शकांनी रस्ता अडवल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिटे अडकला होता. यावर यानंतर भटिंडा एअरपोर्टवरुन दिल्लीला जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एअरपोर्ट अधिकाऱ्यांकडे एक संदेश दिला. तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंतपणे दिल्लीला जाऊ शकलो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
केद्रींय गृहमंत्रालयानं झापलं
दरम्यान, आज घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारला खरमरीत पत्रही लिहिलंय. या प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यात कुठे उणीवा झाल्या, कोण दोषी याचा तात्काळ अहवाल द्या असंही बजावण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित कार्यक्रम निदर्शनांमुळे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता या घटनेनंतर राजकारणही कसं वळण घेतंय हे पाहावं लागेल.
पंजाबमधल्या या घटनेनंतर आता राजकारणही जोरात सुरु झालंय. पंजाबमधे काँग्रेसचे चरणजितसिंह चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानांचा ताफा येणार हे माहिती असूनही त्याच रस्त्यावर निदर्शकांनाही पोहचू दिलं असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलाय. तोडग्यासाठी प्रयत्न चालू असताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी फोनही उचलला नाही असा आरोप त्यांनी केला.
संबंधित बातमी :
- PM Modi Punjab Rally : सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतले