PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळेस पंतप्रधानपद भूषवलं असलं तरी त्यांनी आता पुढील टर्मसाठीदेखील सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या तरी आराम करावा असे काही वाटत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट सांगितले आहे. 


गुरुवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, एके दिवशी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने भेट घेतली होती. त्यावेळी या नेत्याने म्हटले की, तुम्हाला दोन वेळेस जनतेने पंतप्रधान केले आहे, आता काय करणार आहात? असा प्रश्न केला होता. 


यावेळी पंतप्रधान मोदींनी त्या नेत्याने नाव सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, या नेत्याच्या राजकारणाचा विरोध करतो. मात्र, त्यांचा मी आदरदेखील करतो.  या ज्येष्ठ विरोधी पक्षाच्या नेत्याला वाटत होतं की, मी दोन वेळेस पंतप्रधान झालो म्हणजे खूप काही साध्य केले आहे. मात्र, त्यांना माहित नाही की मोदी हा वेगळ्या मातीचा आहे. गुजरातच्या मातीने मोदीला तयार केले आहे. त्यामुळे काही गोष्टी साध्य झाल्या की आराम करावा असे मला वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, केंद्र सरकार जनतेसाठी लागू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. मागील आठ वर्षाच्या काळात सर्व प्रयत्न केल्यानंतर आता योजनांची अंमलबजावणी 100 टक्क्यांच्या जवळ पोहचली असल्याचे त्यांनी सांगितले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढं म्हटले की, आठ वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कंबर कसून सर्वांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. प्रत्येक गरजूला, नागरिकाला त्याचे हक्क, अधिकार देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: