PM Modi Maharashtra LIVE : शरद पवार कृषीमंत्री होते, केंद्रात यूपीएचं भ्रष्ट सरकार होतं, मोदींचा हल्लाबोल

PM Modi in Yavatmal Maharashtra Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचं लोकार्पण केलं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Feb 2024 06:51 PM
PM Modi speech : शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हा केंद्रात यूपीएचं भ्रष्ट सरकार होतं, मोदींचा हल्लाबोल

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. जेव्हा यूपीए सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती?. तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे.  हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते. 

PM Modi speech : मागच्यावेळी यवतमाळमध्ये आलो NDA 350 पार गेली, आता 400 पार नक्की होणार

यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदींनी "जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा" असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली. 
 
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? 


10 वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला आलो तेव्हा तुम्ही NDA ला 300 पार केले.. 2019 मध्ये आलो तेव्हा  तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही NDA ला 350 पार पोहोचवले. आणि आता 2024 मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे.. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार. 


संपूर्ण विदर्भात ज्या पद्धतीचं प्रेम मिळत आहे, ते पाहता हे निश्चित आहे यंदा NDA 400 पार. 


आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे. गरीब , युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे. 

CM Ekanth Shinde speech Yavatmal: देशात 400 तर महाराष्ट्रात 45 पार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार 

10 वर्षात मोदींनी एक ही सुट्टी घेतली नाही. आता घर घर मोदी नाही ते मन मन मोदी आहे. मोदींवर त्यांच्या गॅरंटी वर जनतेचा विश्वास आहे. मोदी तिसऱ्यांदा pm बनणार. यंदा देशात 400 पार निश्चित असून महाराष्ट्रात आम्ही 45 पार करून मोदींचे हाथ मजबूत करणार..

CM Ekanth Shinde speech Yavatmal: पंतप्रधान मोदी हॅटट्रिक करणार

महाराष्ट्रात आम्ही मोदींचा हार्दिक स्वागत करतो.. मागील दशक आमच्या देशासाठी स्वर्णकाळ राहिला असून त्याचे शिल्पकार मोदी आहेत... 


महाराष्ट्रात मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात अनेक योजना मिळत असून त्यावरून महाराष्ट्रावर मोदींचा प्रेम दिसून येते.. 


महाराष्ट्राच्या नमो महिला सक्षमीकरण अभियान द्वारे 55 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल.. तर 2 कोटी महिला बचत गटांशी जोडल्या जातील...


मोदींनी गेल्या 10 वर्षात आत्मनिर्भर भारताची योजना राबवून देशाचा आत्मविश्वास वाढविला आहे..

Devendra Fadnavis speech Yavatmal: गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चारच जाती : देवेंद्र फडणवीस

ज्या यवतमाळ मध्ये जगातील एकमेव सीता मातेचं मंदिर आहे तिथं आज मोदींच्या हस्ते नारी वंदन कार्यक्रम होत आहे. साडे पाच लाख बचत गटांना revolving fund म्हणून कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मोदी नेहमी म्हणतात फक्त चार जाती आहेत, गरीब, शेतकरी, युवा आणि महिला.. आज या चारही जातींना मदत मिळत आहे. 


शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. शिवाय मोदी आवास योजनेअन्वये घरे दिली जाणार आहे, त्यात ही महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल.  सिंचनाच्या योजनाही देऊन विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर केले जात आहे. वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे ही मिळत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


 

Ajit Pawar speech Yavatmal : अजित पवारांकडून मोदींचं कौतुक 

PM झाल्यानंतर मोदींनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या, त्यात स्वच्छतापासून  सक्ष्मीकरण पर्यंतच्या योजना आहे.
मोदींमुळे महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि हजारो कोटींचे कर्ज मिळाले आहे.
आम्ही सर्व मोदींच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, जब आती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है...

PM Narendra Modi Visit To Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळमध्ये पोहचले असून त्यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. जिल्हाभरातून जवळपास दीड लाख महिला या मेळाव्यासाठी आल्या आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असून, 100 गेट या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. प्रत्येक महिलेला तपासणी करूनच आतमध्ये पाठवण्यात येत आहेत. संपूर्ण विदर्भामधून 4000 पोलीस अधिकारी कर्मचारी फोर्स वन, क्यू.आर.टी, एसआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहे. 

Bhavana Gawali Yavatmal: मोदींची गॅरंटी आपल्यासोबत, यवतमाळला 40 वर्षांनी रेल्वे

मोदी सरकारने महिलांसाठी भरपूर काही केले असून केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्या पाठीशी आहे. मोदींनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिले आहे. मी गेले आठ महिन्यापासून मोदींना बचत गटातील महिलांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये या अशी विनंती करत होती.आणि आज मोदी प्रत्यक्षात यवतमाळमध्ये येत आहेत. मोदींची गॅरंटी आपल्या सोबत आहे. यवतमाळची रेल्वे आज प्रत्यक्षात येत आहे, 40 वर्षांपासून आपण रेल्वेची वाट पाहत होतो, असं शिवसेना खासदार भावना गवळी म्हणाल्या.

PM Modi in Maharashtra : पंतप्रधान मोदी नागपूरवरुन यवतमाळकडे रवाना

नागपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी 4.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. 


प्रशासनाच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. आगमनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आ. सर्वश्री प्रवीण दटके,  कृष्णा खोपडे, मोहन मते, मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष  पोद्दार यावेळी उपस्थित होते.


यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते होणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने त्यांनी यवतमाळकडे प्रयाण केले.



PM Modi in Maharashtra : पंतप्रधान मोदी नागपूरवरुन यवतमाळकडे रवाना

 नागपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सायंकाळी 4.40 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. 


प्रशासनाच्या वतीने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. आगमनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आ. सर्वश्री प्रवीण दटके,  कृष्णा खोपडे, मोहन मते, मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष  पोद्दार यावेळी उपस्थित होते.


यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे होणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते होणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने त्यांनी यवतमाळकडे प्रयाण केले.


PM Narendra Modi Visit To Yavatmal : बंजारा भाषेतून गाणे म्हणत महिला मोदींच्या सभेकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकरिता जिल्हाभरातून महिला बचत गटांच्या महिला  सभास्थळी येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील हुडी या गावातील महिला बचत गटांच्या महिला या मोदी यांच्या संदर्भातील आपल्या बंजारा भाषेमधील गाणे म्हणत सभास्थळाकडे येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महिलांना रोजगार बचत गटांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आज महिला सक्षम होऊन आपल्या पायावरती उभ्या असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. मोदी यांनी राम मंदिर, जे 500 वर्षाची स्वप्न होते ते सुद्धा साकार केल्याचे या महिलांनी यावेळी सांगितले. असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंजारा बोली भाषेत गुणगान करीत ते या मेळाव्याच्या स्थळी येत आहे.

PM Narendra Modi Visit To Yavatmal : साडेचार वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये पोहोचणार

पतंप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळच्या दौऱ्यावर असून थोड्याच वेळात ते पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यवतमाळमध्ये पोहोचले आहेत.

PM Narendra Modi In Yavatmal : मोदींच्या स्वागतासाठी राज्यपालांसह मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार विमानतळावर पोहचले

PM Narendra Modi In Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, काही वेळात त्यांचे आगमन होणार आहेत. विशेष म्हणजे यवतमाळ विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी पोहचले आहेत. 

PM Narendra Modi In Yavatmal : मोदींच्या सभेच्या ठिकाणी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त...

PM Narendra Modi In Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या काही वेळातच यवतमाळमध्ये पोहचणार असून, त्यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून जवळपास दीड लाख महिला या मेळाव्यासाठी येत आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असून, 100 गेट या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. प्रत्येक महिलेला तपासणी करूनच आतमध्ये पाठवण्यात येत आहेत. संपूर्ण विदर्भामधून 4000 पोलीस अधिकारी कर्मचारी फोर्स वन, क्यू.आर.टी, एसआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहे. 

PM Narendra Modi In Yavatmal : मोदींच्या सभास्थळी महिलांची गर्दी वाढू लागली

PM Narendra Modi In Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून महिला बचत गटांच्या महिला सभास्थळी येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील हुडी या गावातील महिला बचत गटांच्या महिला या मोदी यांच्या संदर्भातील आपल्या बंजारा भाषेमधील गाणे म्हणत सभास्थळाकडे निघाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी महिलांना रोजगार बचत गटांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले आहेत, आज महिला सक्षम होऊन आपल्या पायावरती उभ्या असल्याची भावना यावेळी व्यक्त केली जात आहे. मोदी यांनी राम मंदिर जे 500 वर्षाची स्वप्न होते ते सुद्धा साकार केल्याचे या महिलांनी यावेळी सांगितले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंजारा बोली भाषेत गुणगान करीत ते त्या मेळाव्याच्या स्थळी येत आहे. 

PM Narendra Modi : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवरील राहुल गांधींचे स्टिकर्स काढायला सुरुवात

PM Narendra Modi In Yavatmal : यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज सभा होणार आहे. या सभेमध्ये लाखो महिला उपस्थित राहतील असा आयोजकांचा दावा आहे. सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, काही खुर्च्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांचे स्टिकर लावण्यात आलेले आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधीच्या स्टिकर लावलेल्या खुर्च्या का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून, याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारा एक स्टिकर लावण्यात आलेला होता. त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेस पक्षाला देणगी देण्यासंदर्भात आवश्यक तपशीलासह क्यूआर कोड छापण्यात आलेला होता. पण ही चूक लक्षात येताच ते स्टिकर काढायला सुरुवात झाली आहे.

PM Narendra Modi In Yavatmal : मोदींची बहीणचं महायुतीच्या जाहिरातीमधून गायब!

PM Narendra Modi In Yavatmal : पंतप्रधान मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, यानिमित्ताने महायुतीकडून मोदींच्या स्वागताच्या जाहिराती वेगवेगळ्या दैनिकात देण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महायुतीच्या जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदारांचे फोटो आहेत. मात्र, याच जाहिरातमध्ये खासदार भावना गवळी यांचा फोटो नाही. त्यामुळे खासदार गवळींच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर, यावर स्वतः गवळी यांनी खुलासा केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी एका जागा जिंकून दाखवावी : गिरीश महाजन

PM Narendra Modi In Yavatmal : शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. यासोबतच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही आव्हान त्यांनी शरद पवारांना दिलंय. यावेळी मनोज जरांगे पाटलांवर महाजनांनी जोरदार टीका केलीय. यवतमाळ येथे मोदींचा कार्यक्रम होणार असून, यावेळी महाजन बोलत होते. 


आज यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थित महिला बचत गटाचा महामेळावा होतोय. या मेळाव्याला पंतप्रधान मोदी या मेळाव्याला संबोधित करणारायेत. याच सभेत राज्यातील रस्ते, रेल्वे आणि सिंचनाच्या 4900 कोटींच्या कामाचं लोकार्पण आणि शुभारंभ होतोये. यासोबतच इतर अनेक सरकारी योजनांचं लोकार्पण आणि लाभार्थ्यांना लाभही प्रतिकात्मक स्वरूपात दिला जाणार आहे. या मेळाव्याच्या तयारीविषयी आणि त्या अनुषंगाने रंगलेल्या राजकारणाविषयी मेळाव्याचे मुख्य सनन्वयक मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती देखील दिली आहे. 

PM Narendra Modi : संधी मिळाल्यास मोदींकडे शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा मांडणार : संजय राठोड

PM Narendra Modi In Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळच्या सभेच्या ठिकाणी मंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली आहे. "यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या खूप आहे, मला जर निवेदन करण्याची संधी मिळाली तर मी नक्की हाच मुद्दा मांडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तसं शेतकऱ्यांसाठी खूप योजना आणल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळला येत असल्याने खूप आनंदाचा दिवस आहे अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. 

PM Narendra Modi : मोदींच्या सभेसाठी राज्यभरातील 1925 एसटी बसेस आरक्षित

PM Narendra Modi In Yavatmal : आजच्या मोदींच्या यवतमाळातील सभेसाठी राज्यभरातून 1925 एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्यात. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून बसद्वारे बचतगटाच्या महिलांना यवतमाळमध्ये मेळाव्यासाठी आणलं जाणार. एका बसचं सरासरी 25 हजार रूपये भाडं. बससाठी 55 रूपये प्रतिकिलोमीटर भाडं आकारलं जातंय. 

पार्श्वभूमी

PM Modi in Maharashtra Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर होते. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे झालेल्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते झालं.  


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.