नवी दिल्लीः परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर मदत केल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इटलीला हनिमूनसाठी जाणाऱ्या जोडप्याचा पासपोर्ट हरवला आणि त्यांनी थेट स्वराज यांनी ट्वीट केलं. या जोडप्याला त्वरित डुप्लिकेट पासपोर्टची सोय करण्यात आली.

 

 

फैझन पटेल नावचे व्यक्ति इटलीला हनिमूनसाठी निघाले होते. मात्र पटेल यांच्या पत्नीचा ऐनवेळी पासपोर्ट हरवला. पटेल यांनी आपलं गाऱ्हाणं स्वराज यांच्याकड  मांडलं आणि तातडीने मदतीचं आश्वासनही मिळालं.

 

https://twitter.com/faizanpatel/status/762631087516422144

 

स्वराज यांनी ट्विटरद्वारे मदत करण्याचं हे पहिलंच उदाहरण नाही. यापूर्वीही अशाच प्रकारे तातडीने मदत केल्याची उदाहरणं समोर आली आहेत. पासपोर्ट हरवल्याची तक्रार परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर करावी लागते, मात्र त्यापूर्वीच खुद्द मंत्री नागरिकांची मदत करत आहेत.

 

https://twitter.com/SushmaSwaraj/status/762698227271421952