नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन पतधोरणानुसार रेपो दर पूर्वीप्रमाणे 6.5 टक्के आणि सीआरआर यांचे दर 4 टक्के एवढेच राहणार आहेत. व्याज दर कमी करुनही बँकांनी ग्राहकांना लाभ दिला नाही, अशा शब्दात राजन यांनी बँकांवर नाराजी व्यक्त केली.


 

 

आरबीआयने पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी कारकीर्दीतील शेवटचं पतधोरण जाहीर करताना दरात कसलीही वाढ किंवा कपात केली नाही. राजन 4 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

 

 

जीएसटीबाबत आरबीआयने सकारात्मकता दाखवली आहे. जीएसटीमुळे विकासदर वाढेल तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्यास मदत होईल. त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढणार असल्याचं आरबीआयने सांगितलं आहे.