नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने भगवान शिव, भगवान विष्णू आणि जैन परंपरेशी संबंधित 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत, ज्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. सूत्रांनी सांगितले की, एक ऐतिहासिक पाऊल उचलत ऑस्ट्रेलियाने 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत. या पुरातन वस्तूंचे सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या वस्तू अतिशय प्राचीन असून भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिक आहे. यामध्ये अने देवी-देवतांच्या मूर्ती, प्राचीन सजावटीचे सामान यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
या पुरातन वस्तू 'भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य', 'शक्तीची उपासना', 'भगवान विष्णू आणि त्यांची रूपे', जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ अशा विविध प्रकारच्या साहित्यापासून बनवलेली शिल्पे आणि कागदावर काढलेली चित्रे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या पुरातन वस्तू प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील परंपरेचे प्रतिक असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात अनेक प्राचीन वस्तू भारतात परत आणल्या गेल्याचा दाव करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्याचे पार्थिव कर्नाटकात दाखल, मुख्यमंत्री बोम्मईंनी वाहिली श्रद्धांजली
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी घट, 1549 नवीन रुग्ण आणि 31 मृत्यू
- Uttarakhand CM : कोण होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री? राजनाथ सिंह करणार नावाची घोषणा, धामीसह हे दिग्गज नेते शर्यतीत
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha