PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांना 'कृष्णा पंखी' भेट दिली. हे चंदनाच्या लाकडापासून बनविलेले आहे आणि त्याच्या बाजूंच्या कलात्मक प्रतिकृतीमधून भगवान कृष्णाच्या विविध मुद्रांचे चित्रण केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कृष्ण पंखी' पारंपारिक साधनांचा वापर करून चंदनाच्या लाकडामध्ये कोरून बनवण्यात आली आहे.


कृष्णपंखीवर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराची हाताने कोरलेली प्रतिकृती आहे. ही 'कृष्णपंखी' राजस्थानमधील चुरू येथील कुशल कारागिरांनी तयार केली आहे. ही कलाकृती शुद्ध चंदनाच्या लाकडापासून बनलेली आहे जी प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील जंगलात आढळते.


किशिदा यांचा पहिला भारत दौरा
शनिवारी जपानचे पंतप्रधान किशिदा उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात पोहोचले. जपान सरकारचे प्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटले आहे की, पंतप्रधान जपानशी मैत्री मजबूत करत आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि किशिदा यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.


भारत - जपानमध्ये सहा करार


भारत आणि जपानमध्ये शनिवारी सहा करार झाले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ काशिदा शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी सायंकाळी शिखर परिषदेत काशिदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. पुढील पाच वर्षांत जपान भारतामध्ये 3.2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha