Centre on Covid19: देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होताच या साथीच्या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली होती. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत.


गेल्या दोन वर्षांपासून या कॉलर ट्यूनने लोकांचा पाठलाग सोडलेला नाही. मात्र आता लवकरच तुमची या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या कॉलर ट्यूनचा उद्देश पूर्ण झाला आहे. काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे कॉल्स करताना या कॉलर ट्यूनमुळे उशीर होतो. याबाबत माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने (DoT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (CoA) तसेच मोबाइल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख आहे.


दूरसंचार विभागाने जारी केली होती कॉलर ट्यून 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनंतर, ही 'कॉलर ट्यून' दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. दूरसंचार सेवेने (TSPs) लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी, तसेच साथीच्या आजारादरम्यान घ्यावयाच्या खबरदारी आणि लसीकरणांबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी कॉल करण्यापूर्वी कोरोना व्हायरसशी संबंधित कॉलर ट्यून ऐकवली जात होती.


महत्वाच्या बातम्या 


Attack on CM Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धक्काबुक्की; पोलिसांनी अज्ञात व्यक्तीला घेतलं ताब्यात


Bharat Bandh 2022 : 28 आणि 29 मार्चला भारत बंद, बँकिंग, वाहतुकीसह विविध सेवांना बसणार फटका!


Imtiyaz Jaleel : मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा; जलील यांचा गौप्यस्फोट


Nanded : नांदेडमध्ये बर्निंग ट्रकचा भर रस्त्यात थरार,चालकाचा मृत्यू