नवी दिल्ली : देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सीमेवरील जवानांसोबत साजरी केली. जम्मू काश्मीरच्या सीमेवर तैनात असलेल्या राजोरीतील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातानी जवानांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजोरी येथे दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवरील जवानांशी देखील संवाद साधला. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दिली.


https://twitter.com/narendramodi/status/1188413991057534976

मोदी जवानांशी संवाद साधताना म्हणाले, आपल्याकडे अनेक सीमावर्ती भाग आहेत. पण तुम्ही देशाच संरक्षण करीत असलेला हा भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ठिकाणी होणारे युद्ध, बंडखोरी, घुसखोरी यांमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. तुमच्यामुळे देशातील शांतता अबाधित आहे. त्यानंतर मोदी यांनी राजोरी येथील जवानांना मिठाई भरवली.

पंतप्रधान मोदी जवानांसोबत गेली 5 वर्षे दिवाळी साजरी करत आहे. जवानांनाच ते आपले कुटुंब मानत असल्याने दरवर्षी ते सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. गेल्या वर्षी मोदी यांनी उत्तराखंडमधील भारत आणि चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

https://twitter.com/narendramodi/status/1188415650055802880