PM Modi In Arunachal Pradesh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) इटानगर येथील पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन केले. याशिवाय पंतप्रधान मोदींनी 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केंद्रही राष्ट्राला समर्पित केले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करून शुभेच्छाही दिल्या. 2019 मध्ये पंतप्रधानांनी या विमानतळाची पायाभरणी केली होती, तब्बल 645 कोटी रुपये खर्चून या विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे.
स्वातंत्र्यानंतर ईशान्य भाग अनेक दशकांपासून दुर्लक्षित
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर ईशान्य भाग अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला. अटलजींचे सरकार आल्यावर पहिल्यांदाच या ठिकाणी बदल करण्याचा प्रयत्न झाला. ईशान्येच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय असणारे हे पहिले सरकार होते.
दिशाभूल करण्याची वेळ गेली - पंतप्रधान मोदी
पीएम मोदी आपल्या भाषणात म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का? की, आम्ही एक अशी कार्यसंस्कृती आणली आहे, ज्याच्या माध्यमातून हे सरकार ज्या प्रकल्पांची पायाभरणी करते, त्यांचे उद्घाटनही करते. पूर्वीच्या सरकारप्रमाणे 'अडकले, लटकले, भटकले'चे युग गेले. दिशाभूल करण्याची वेळ गेली असं मोदी म्हणाले आहेत.
आधी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात होते पण आता - पंतप्रधान
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आमचे स्वप्न फक्त भारतमातेसाठी आहे, अरुणाचलच्या या यशाबद्दल संपूर्ण ईशान्येचे अभिनंदन, पूर्वी लोक इथे फक्त निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचे. मात्र आता इथले आता वातावरण बदलत आहे. आता केवळ प्रयत्नच नाही तर विकासही दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Indira Gandhi: एक संधी मिळाली अन् इंदिरा गांधींनी 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे केले; नेमकं काय घडलं?