बेअर ग्रिल्सने एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. बेअर ग्रिल्सने या पोस्टला कॅप्शन दिलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 'Man Vs Wild'चा एपिसोड 3.6 बिलियन सोशल इम्प्रेशनसह ऑफिशिअल जगभरातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन इव्हेन्ट बनला आहे. या एपिसोडने सुपर बॉल इव्हेंटलाही मागे टाकलं आहे.सुपर बॉलचे 3.4 बिलियन सोशल इम्प्रेशन्स होते. त्यामुळे हा एपिसोड पाहणाऱ्या सर्वांचे आभार."
या एपिसोड दरम्यान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स यांच्यात विविध विषयांवर संभाषण झालं. पशुसंवर्धन आणि पर्यावरण परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींचं वेगळं रुप लोकांना पाहायला लोकांना मिळालं.
जगभरातील 180 देशांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी 8 भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला होता. यामध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी या भाषांचा समावेश आहे.