कोळीकोड : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक केरळमधल्या कोळीकोडमध्ये पार पडणार आहे.


भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रॅली आयोजित करण्य़ात आली आहे. त्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या बाबतीत काय विधान करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मोदी दुपारी 3 वाजता कोळीकोडमध्ये दाखल होतील, त्यानंतर चार वाजता रॅलीला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या भाषणात गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, केरळमधील राजकीय हिंसाचार आणि संघ, भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ले हे मुद्दे प्रामुख्याने येतील, असा अंदाज बांधला जात आहे.