नवी दिल्ली : 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणास 3 जानेवारी 2022 पासून सुरूवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. तर 60 वर्षांपुढील 90 टक्के नागरिकांनी एक लस घेतली आहे. नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होणार आहे. जेव्हा अनेक जिल्ह्यातील 100 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याच्या बातम्या येतात तेव्हा अभिमान वाटतो.
लसीकरणाबाबत सध्या देश सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. देशात 141 कोटी नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओमायक्रॉनची सध्या चर्चा होत असून देशातील शास्त्रज्ञांचे त्यावर लक्ष असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, अनेक देशात ओमायक्रॉनचे संकट आले आहे. ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. भारतानं आतापर्यंत 141 कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :