Platform Ticket : भारतात रेल्वेने (Indian Railway) रोज लाखो लोक प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान आहे. संरक्षण मंत्रालयानंतर भारतीय रेल्वेकडे सर्वात जास्त कर्मचारी आहेत. आपल्यातील अनेकांनी कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला असेलच. त्यामुळे रेल्वेना प्रवास करताना तिकीट घेणे आवश्यक असते. याशिवाय तुम्हाला जर स्टेशनवर काही काळ थांबावं लागणार असेल, तर अशा वेळी तुम्हाला प्लॅटफार्म तिकीट (Platform Ticket) देखील घेण्याची आवश्यकता असते.
कधी कधी रात्री प्रवास करताना उशीर झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे पुढील प्रवासासाठी जाता येत नाही. तर कधी रात्री रेल्वे स्टेशनवर उतरुन काही कारणांमुळे सकाळपर्यंत तिथेच थांबण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याजवळ प्लॅटफॉर्म तिकीट असणे आवश्यक आहे का? याबद्दल काही नियम आहेत का ते संक्षिप्तपणे जाणून घेऊया.
नेहमीच प्लॅटफॉर्म टिकीट घेणे अनिवार्य आहे का?
समजा, तुम्हाला रात्री एक-दोन वाजता स्टेशनवर उतरावे लागले आणि सकाळपर्यंत स्टेशनवरच थांबण्याची वेळ आली तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट विकत घ्यावं लागेल का? असा सवाल तुमच्या मनात येतच असेल. तुमच्यातील बहुतेकांसोबत प्रवासासंबंधित काही ना काही अनुभव असतो. काहीवेळा प्रवास करताना रात्री उशीर झाल्यामुळे वाहन मिळत नाही. तर कधी कधी पुढीस स्टेशनला जाण्यासाठी रेल्वे मिळत नाही. यामुळे प्रवासी म्हणून तुम्हाला रात्र स्टेशनवरच बसून काढावी लागते आणि सकाळ होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. अशी परिस्थिती बहुतांशवेळा पावसाळा आणि खूप थंडीच्या दिवसांत निमशहरी आणि खेड्यासारख्या भागात ओढवते. अशावेळी तुम्हाला/लोकांना रात्रभर स्टेशनवर थांबून सकाळ होईपर्यंत वाट पाहत राहावे लागते. यानंतरच पुढील प्रवासासाठी रवाना व्हावं लागते. अर्थात, हे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे ते पुढील मुद्द्यांमधून स्पष्ट होईल.
प्रवास संपल्यानंतरही सकाळपर्यंत स्टेशनवर थांबू शकता का?
खरे पाहता तुमच्यातील कोणालाही एक प्रवासी म्हणून स्वत:च्या जीवाची खूप काळजी असते. म्हणून प्रवास संपल्यानंतरही बहुतेक जण स्टेशनवरच थांबण्याचा निर्णय घेतात. तसेच हा प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आहे. म्हणून रात्री उशिरापर्यंत प्रवास पूर्ण केल्यानंतर स्टेशनवर सकाळ होईपर्यंत वाट पाहत थांबणे हा प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे. हा सर्व विचार करुन भारतीय रेल्वेने प्रवासी वेटिंग रुमची व्यवस्था केली आहे. या रुम्समध्ये प्रवाशांना बसण्यासाठी व्यस्था केलेली असते. तसेच सुरक्षिततेशी संबंधित काही शंका असेल स्टेशनवरील उपस्थित सुरक्षारक्षकांना तात्काळ संपर्क करायला हवा. म्हणून तुम्ही जर प्रवासी असाल तर काही कारणास्तव स्टेशनवर थांबण्याची वेळ आली तर तुम्हा थांबू शकता.
पण तुम्हाल एक प्रवासी म्हणून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे. समजा, एखाद्या रेल्वेने प्रवास केल्यानंतर सुरक्षेचा विचार करुन रात्री स्टेशनवर थांबता येईल. अशावेळी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध नसले तरी हरकत नाही. मात्र, तुमच्याकडे प्रवास केलेल्या रेल्वेचे तिकीट असणे गरजेचे आहे. हे तिकीट म्हणजे तुम्ही प्रवासी असल्याचा पुरावा असतो. त्यामुळे कधीही गरज पडल्यास दाखवता येऊ शकते. म्हणून रात्री स्टेशनवर थांबण्याची वेळ आलीच तर प्लॅटफॉर्म तिकीट नाही म्हणून घाबरुन जाण्याची गरज नाही.