नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रालयाला राम राम ठोकल्यानंतर लगेचच पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा रेल्वेमंत्रिपदासाठी सुरु झाली आहे.
रेल्वेमंत्रिपदी पियुष गोयल यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पियुष गोयल यांच्याकडे सध्या केंद्रीय ऊर्जामंत्रिपदाची धुरा आहे. राज्यसभेचे खासदर असलेले पियुष गोयल हे भाजपचे राष्ट्रीय खजिनदारही होते.
सुरेश प्रभूंचा रेल्वेमंत्रालयाला राम राम
"रेल्वेतील 13 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि सदिच्छांबद्दल आभार. तुमच्या आठवणी कायमच सोबत राहतील. सर्वांना शुभेच्छा.", असे म्हणत सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाला राम राम ठोकला आहे.
https://twitter.com/sureshpprabhu/status/904222950366306305
पियुष गोयल यांची रेल्वेमंत्रिपदी वर्णी लागणार : सूत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Sep 2017 12:08 PM (IST)
सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रालयाला राम राम ठोकल्यानंतर लगेचच पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा रेल्वेमंत्रिपदासाठी सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -