पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात तिघं जण जखमी झाले आहेत. 'एएनआय'च्या माहितीनुसार ही घटना 28 मार्चला दिल्लीतील उत्तमनगर भागातल्या एका गल्लीत घडली.
व्हिडिओत एक कुत्रा धावत येताना दिसतो. त्यानंतर त्याने एका लहान मुलावर हल्ला चढवला. मुलाला वाचवण्यासाठी एक महिला धावली. कोणी त्याला काठी मारली, तर कोणी खुर्ची, मात्र कुत्रा काही केल्या थांबत नव्हता.
अखेर, लहानग्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवण्यात आलं. मात्र कुत्रा सैरावैरा इतरांच्या मागे पळतच आहे.
हा कुत्रा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या पिटबुल टेरियर जातीचा आहे.