Diwali Gift to Employees : पुढच्या काही दिवसांवरच दिवाळीचा सण आला आहे. सर्वत्र या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच कंपन्या आपापल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत असतात. पण एक अशी कंपनी आहे की, त्या कंपनीच्या मालकाने एक आश्चर्यकारक गोष्ट केली आहे. या कंपनीच्या मालकाने दिवाळीपूर्वीच अनेक कर्मचाऱ्यांना गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. 


दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण मानला जातो, पण नोकरदार लोकांसाठी या सणाला कंपन्यांकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंना एक विशेष महत्व आहे. दिवाळीनिमित्त कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू, बोनस इत्यादी देतात, अशी परंपरा आहे. भारतात जवळपास सर्वच कंपन्या या परंपरेचे पालन करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देण्यासाठी तिजोरी उघडली आहे.


अनेक कर्मचाऱ्यांना गाड्या मिळणार 


एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंचकुला, हरियाणातील एमआयटीएस हेल्थकेअर येथील फार्मास्युटिकल कंपनीने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार दिल्या आहेत. रिपोर्टनुसार, कंपनीने 12 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या आहेत. कंपनीचे स्टार परफॉर्मर म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना या भेटवस्तू मिळाल्या आहेत. आता कंपनी आणखी 38 कर्मचाऱ्यांना कार देणार आहे. अशा प्रकारे औषध कंपनीच्या 50 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून गाड्या मिळणार आहेत.


मेहनती कर्मचाऱ्यांच्या जोरावरच कंपनी नफ्यात


फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक आणि मालक एमके भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कंपनी सेलिब्रिटी आणि स्टार्स सारख्या सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांना वागवते. मेहनती कर्मचाऱ्यांच्या जोरावरच कंपनी सध्याच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकली आहे, असे ते म्हणाले. या कारणास्तव, त्यांच्या मेहनतीचे आणि त्यांच्या निष्ठेचे फळ देणे महत्त्वाचे आहे. भाटिया यांनी सांगितले की, त्यांनी नुकतीच 12 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली असून आणखी 38 कर्मचाऱ्यांना भेटवस्तू मिळणार आहे.


भेटवस्तू मिळाल्यानंतर कर्मचारी आनंदी


फार्मास्युटिकल कंपनीतील कर्मचारी असलेल्या शिल्पाने एएनआयला सांगितले की, ती MITS हेल्थकेअरमध्ये आठ वर्षांपासून काम करत आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती कंपनीत रुजू झाली तेव्हा संचालकाने सांगितले होते की त्यांना कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करायची आहे. आता ते स्वप्न पूर्ण झाले आहे. शिल्पा ही फार्मास्युटिकल कंपनीच्या पहिल्या 12 कर्मचाऱ्यांपैकी एक आहे, ज्यांना भेट म्हणून नवीन कार मिळाली आहे.


यापूर्वी अनेक कंपन्यांनी हे काम केले आहे


दिवाळीत कर्मचाऱ्यांना भरघोस भेटवस्तू देण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी चेन्नईतील एका आयटी कंपनीने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या होत्या. गुजरातचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तो जवळजवळ दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना अद्भुत भेटवस्तू देतो.


महत्त्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, 5 वर्षे  मिळणार मोफत रेशन