नवी दिल्ली : भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने 'ना नफा' या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली आहे. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
भारत सरकारने सुरू केलेल्या व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी फायझर कंपनी 'ना नफा' या किंमतीमध्ये लस देण्यास तयार आहे. त्या संबंधी आम्ही भारत सरकारच्या सातत्याने संपर्कात असून आमची चर्चा सुरू आहे असं फायझर कंपनीचे प्रवक्त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं आहे.
अमेरिकन कंपनी फायझरने स्पष्ट केलं आहे की सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी कंपनीचे काही वेगळी धोरणं असून त्याच्या आधारे ना-नफा किंमतीमध्ये काही देशांना कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत.
विकसित, विकसनशील आणि मागासलेल्या देशांसाठी फायझरच्या कोरोना लसींच्या किंमती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील कोरोना लसीकरणामध्ये कंपनीचा हातभार लागेल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीच्या एका डोसची किंमत ही 19.5 डॉलर इतकी आहे. तर युरोपमध्ये कंपनीने आपल्या लसीच्या किंमतीत वाढ केली आहे. सुरुवातीला 12 युरोमध्ये उपलब्ध होणारी ही लसीची किंमत नंतर 15.5 इतकी करण्यात आली आणि त्यात आता पुन्हा वाढ करून 2022-23 सालच्या अॅडवान्स ऑर्डर्स साठी ती 19.5 युरो इतकी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccination Registration: येत्या 24 एप्रिलपासून लसीकरणासाठी 18 वर्षांवरील सर्वांना नोंदणी करता येणार
- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची सुमोटो याचिका; केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश
- Covishield Vaccine Price : कोविशिल्ड लस राज्यांना महाग; सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपये तर खासगीसाठी 600 रुपये किंमत