नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक करणं बंधनकारक केलं आहे. जर कोणी खातेधारक आधार लिंक करणार नाही तर त्याला आता प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही. हा नियम 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे. 


आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक केलं नसेल तर ECR (Electronic Challan cum Return) दाखल होणार नाही, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही. सर्व पीएफ धारकांचे खाते युएएन (UAN) सोबत व्हेरिफाईड होणं अत्यावश्यक आहे. 


 




अशा पद्धतीने आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक करु शकता.



  • सर्व प्रथम  EPFO पोर्टल epfindia.gov.in यावर भेट द्या.

  • epfindia.gov.in वर लॉगइन करा.

  • Online Services ऑप्शन मध्ये  e-KYC portal या ठिकाण जा आणि  Link UAN Aadhaar यावर क्लिक करा.

  • UAN नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.

  • EPFO च्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. 

  • तो ओटीपी नंबर आणि आपला 12 अंकी आधार नंबर नोंद करा.

  • त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.

  • हे झाल्यानंतर OTP Verification  या पर्यायावर क्लिक करा.

  • आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी आपल्या आधार नंबरवर असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी नोंद करा. 
    त्यानंतर आपले EPFO खातं आधारशी लिंक होईल. 


महत्वाच्या बातम्या :