नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 98 पैशांनी महागलं आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.

 

यापूर्वी 16 मार्च रोजी पेट्रोलचे 3.07 रुपयांनी आणि डिझेलचे दर 1.90 रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर 17 फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केले होते. तेव्हा पेट्रोलचे दर 32 पैशांनी स्वस्त झालं होतं. मात्र डिझेल 28 पैशांनी महागलं होतं.