नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. देशातील टॉप-100  विद्यापीठ आणि अभियांत्रिकी विद्यापीठांची, मॅनेजमेंट आणि फार्मसीमधील टॉप-50 विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, मुंबईतील केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठी यासंह अनेक विद्यापीठांचा या याद्यांमध्ये समावेश आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापाठीचा टॉप-100 विद्यापीठांमध्ये क्रमांक लागला नाहीय.

 

विद्यापीठ (टॉप-10 रँकिंग)

  1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलुरु (बंगळुरु, कर्नाटक)

  2. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई, महाराष्ट्र)

  3. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (दिल्ली)

  4. हैदरबाद विद्यापीठ (हैदराबाद, तेलंगणा)

  5. तेझपूर विद्यापीठ (तेझपूर, आसाम)

  6. दिल्ली विद्यापीठ (दिल्ली)

  7. बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी, उत्तर प्रदेश)

  8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी (तिरुअनंतपुरम, केरळ)

  9. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (पिलानी, राजस्थान)

  10. अलिगढ मुस्लीम विद्यापीठ (अलिगढ, उत्तर प्रदेश)


 

इंजिनिअरिंग (टॉप-10 रँकिंग)

  1. आयआयटी मद्रास (तामिळनाडू)

  2. आयआयटी मुंबई (महाराष्ट्र)

  3. आयआयटी खरगपूर (पश्चिम बंगाल)

  4. आयआयटी दिल्ली (दिल्ली)

  5. आयआयटी कानपूर (उत्तर प्रदेश)

  6. आयआयटी रुर्की (उत्तराखंड)

  7. आयआयटी हैदराबाद (तेलंगणा)

  8. आयआयटी गांधीनगर (गुजरात)

  9. आयआयटी रोपार-रुपनगर (पंजाब)

  10. आयआयटी पाटणा (बिहार)


 

मॅनेजमेंट (टॉप-10 रँकिंग)

  1. आयआयएम बंगळुरु (कर्नाटक)

  2. आयआयएम अहमदाबाद (गुजरात)

  3. आयआयएम कोलकाता (पश्चिम बंगाल)

  4. आयआयएम लखनौ (उत्तर प्रदेश)

  5. आयआयएम उदयपूर (राजस्थान)

  6. आयआयएम कोझीकोडे (केरळ)

  7. आयआयएम नवी दिल्ली (दिल्ली)

  8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट (भोपाळ, मध्यप्रदेश)

  9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (कानपूर, उत्तरप्रदेश)

  10. आयआयएम इंदौर (मध्य प्रदेश)


 

फार्मसी (टॉप-10 रँकिंग)

  1. मणिपल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स (मणिपल, कर्नाटक)

  2. युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स (चंदीगड)

  3. जामिया हमदर्द (दिल्ली)

  4. पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडवणे (पुणे, महाराष्ट्र)

  5. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, निर्मा युनिव्हर्सिटी (अहमदाबाद, गुजरात)

  6. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी (मुंबई, महाराष्ट्र)

  7. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (रांची, झारखंड)

  8. अम्रिता स्कूल ऑफ फार्मसी (कोची, केरळ)

  9. जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी (तामिळनाडू)

  10. जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी (कर्नाटक)


 

विद्यापीठं, इंजिनिअरिंग विद्यापीठं, मॅनेजमेंट विद्यापीठं आणि फार्मसी विद्यापीठांची संपूर्ण यादी म्हणजेच टॉप-100 रँकिंग यादी पाहण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या https://www.nirfindia.org/ranking  या लिंकवर क्लिक करा.